STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

राजकुमार

राजकुमार

1 min
246

ती रोजच विचार करत असे

तिच्या स्वप्नातील राजकुमारचा

तो कधी येऊन घेऊन जाणार

ती वाट पाहते राजमहालाचा


दिवस असेच सरत जातात

रोजच ती त्याची प्रतीक्षा करते

तिला विश्वास असतो स्वप्नांवर

म्हणून तर त्याची वाट पाहते


खरा राजकुमार एक दिवस

तिला नेण्यासाठी तिच्या घरी येतो 

राजकुमार राजस सुकुमार

पाहताच मनातून आवडतो


महाल जरी नसेल घर तरी

तिला ते मनापासून आवडते

राजकुमारासोबतचा संसार

झाडा-वेली प्रमाणे फुलू लागते


दोन वर्षे सरले गोडी संपते

छोट्या गोष्टीवरून वाद होतात

कालचा सुकुमार नकोसे होते

स्वप्नातले दिन संपून जातात


एके दिवशी एकटीला टाकून

तो जातो आपल्या स्वप्नांच्या देशात

ही एकटी पलंगावर बसून

स्वप्नाची उजळणी होती करत


तिला झालेल्या गोष्टीचा आत्ता खूप

मनातून पश्चाताप वाटत राहते

त्याच्यासोबत एकदा तडजोड

केलं नसल्याचं मनी राग येते


निघून गेली वेळ आयुष्यातील

जोरात रडून आहे का फायदा

स्वप्न वास्तव हे कळाले असते

आनंदात जगले असते सदा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational