STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

राजे

राजे

1 min
394



राजे


पहाटमोडी चिमणं पाखरे

सुस्वराने गाती

तरूवेलींना सांगत सुटती

सहयगिरीची नाती..


आणिक उठला पारिजात कसा

फुलली त्याची छाती

गोपगडयांना सांगू लागला

रायगडाची प्रिती...


दवबिंदूही पुलकित झाले

आनंदे भिजली माची

थेंबाच्या गाली उमटली

शिवबाची प्रचिती...


एकची राजा दुनियामध्ये

सुंदर जयाची नीती

काळही अचंबित होई

पाहूणी एैसा महारथी...


डफातूनी शाहिर गर्जला

जोती सांगतो किर्ती

पायधूळ चरणाची तुमच्या

लागो रोज अमुच्या ललाटी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational