राजे मनामनातले
राजे मनामनातले
किल्ले शिवनेरीवर जन्मले
राजमाता जिजाऊंच्या उदरी
शिवाजी राजे प्रत्येकाच्या मनामनातले
संरक्षणासाठी आले रयतेच्या पदरी १
तलवारबाजी,दांडपट्टा शिकले
रायगडावर राज्याभिषेक झाला
मावळ्यांच्या सोबतीने खेळले
महत्त्व दिले जिजाऊंच्या शिक्षणाला २
सर्वधर्म समभाव समाजात ठेवून
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे
महिलांना संरक्षण,सन्मान देऊन
आग्र्याहून पेटार्यातून शिताफीने सुटणारे ३
गनिमी काव्याने शत्रूचा खात्मा करून
शाहिस्तेखानाची बोटे तोडणारे
अफझलखानाचा कोथळा काढून
औरंगजेबाला नामोहरम करणारे ४
महाराष्ट्रातील गडकिल्ले जिंकून
मावळ्यांसह त्यांचे वैभव वाढवणारे
रयतेच्या मनामनातले राजे होऊन
दैवत छत्रपती पदवी मिळवणारे ५
बाजीप्रभू,तानाजी असे एकनिष्ठ मावळे घेऊन
अगदी जीवाची बाजी करून लढणारे
पावनखिंडीत दुर्जनांचा वध करून
पराक्रमाने सारे गडकिल्ले सर करणारे ६
तुळजाभवानीची तलवार घेऊन
महाराष्ट्रात सह्याद्रीचा सिंह गर्जला
जिजाऊंची राजनीती,युद्धनीती शिकून
राजा हिंदवी स्वराज्याच्या हृदयात बसला ७
असा मुत्सद्दी,जाणता पराक्रमी राजा
शहाजी राजांचा शूरवीर छावा
त्रिखंडात दुमदुमला त्याचा गाजावाजा
शत्रूसाठी वापरतो तो नेहमी गनिमी कावा ८
असे हे राजे सर्वांच्याच मनामनातले
मुघलांसाठी मात्र कर्दनकाळ ठरले
त्यांच्या महान तेजस्वी कीर्तीला स्थान हृदयातले
जगभर राजे अमर झाले सर्वांच्या मनात भरले ९
राजे अजूनही तुम्ही महाराष्ट्राच्या मनामनातले
फक्त तुमची जयंती करण्यासाठी सारे आतुरलेले
पण नारींचे बलात्कार, अत्याचार नाही संपलेले
वाया गेले शाळेत तुमचे चांगले धडे शिकलेले १०
