Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

4.0  

Rakesh More

Romance Tragedy

राहतेस तू हृदयात माझ्या

राहतेस तू हृदयात माझ्या

1 min
255


राहतेस तू हृदयात माझ्या 

समोर काही येत नाही 

व्याकुळ होऊन तुझा सतत  

शोध नजर घेत आहे 

ऐकलीस की नाही सखे 

ते मला माहीत नाही 

अंतर्मनातून तुला साद 

सतत मी देत आहे ||0||


खूप काही साठलं आहे 

हृदयात माझ्या काय सांगू 

तू येशील तेंव्हा तुझ्याशी 

खूप खूप बोलायचं आहे 

किती प्रेम तुझ्यासाठी 

जपून ठेवलंय मनात माझ्या 

मनातलं सारं प्रेम 

तुझ्यासमोर खोलायचं आहे 

समोर नसलीस तरी तुझा 

आभास सतत आहे गं 

मन तुझ्या सहवासाच्या 

दुनियेत आता नेत आहे 

ऐकलीस की नाही सखे 

ते मला माहीत नाही 

अंतर्मनातून तुला साद 

सतत मी देत आहे ||1||


माहित नाही तुला काही 

तळमळ तुझी किती आहे 

कधीतरी ये आणि 

हृदयात माझ्या बघ जरा 

असेल जर शक्य तुला 

एक मात्र नक्की कर

तुझ्याविना जगतोय ते 

क्षण तू जग जरा 

अवतीभवती माझ्या तूझ्या 

भावनांचं विश्व आहे 

निसर्गाच्या कणाकणात 

मिळतो तुझा संकेत आहे 

ऐकलीस की नाही सखे 

ते मला माहीत नाही 

अंतर्मनातून तुला साद 

सतत मी देत आहे ||2||


थकलो नाही हरलो नाही 

अजून जिद्द बाकी आहे 

मिलनाची आपल्या सखे 

वाट पाहत आहे मी 

येशील नक्की येशील तू 

मनात हा विश्वास आहे 

उगवणारी प्रेमाची ही

पहाट पाहत आहे मी 

थांबलंय हे जग सारं 

जीव नाही कशातही 

कळत नाही मला तुला 

काय अभिप्रेत आहे 

ऐकलीस की नाही सखे  

ते मला माहीत नाही 

अंतर्मनातून तुला साद 

सतत मी देत आहे ||3||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance