राहो आनंदात सारे
राहो आनंदात सारे
नसो कुणीही दुःखात
राहो आनंदात सारे
सौख्य नांदो घरोघरी
वाहो उन्नतीचे वारे
मानवता हाच धर्म
देऊ सर्वांना आदर
प्रेम अर्पूया जगाला
भरू सत्कर्म घागर
गरजवंताला देऊ
कधी मदतीचा हात
होई भाग्याची पहाट
जाता दुर्दैवी ही रात
मंत्र एकोप्याचा देऊ
मनी रुजवू संस्कार
शिक्षणाची धरू वाट
देऊ जीवना आकार
घेऊ संकल्प आगळे
जगा देऊ दिव्यदृष्टी
घडवण्या नवसृष्टी
करू सुविचार वृष्टी..
