पवित्र धर्माची एकता...
पवित्र धर्माची एकता...


रमजान ईद मुस्लिम बांधवांचा
आहे पवित्र सण हा बंधुभावाचा
सामाजिक एकता आणि शांतता
टिकवण्यास संदेश हातभाराचा...
हिंदू धर्माच्या संत नि तत्वज्ञानींनी
मानवास उपदेशी दिली वागणूक
तशीच कुराणात महान अल्लाच्या
इस्लाम धर्माची आहे शिकवणूक...
अमानवी असल्या ईश्वरी शक्ती
मानवतेची ज्योत मात्र पेटवलेली
अनेक धर्मानुसार अवतारी भक्ती
नियम नि संस्कृती दानात जपलेली...
जरी स्त्रियांसाठी असल्या मर्यादा
ती सर्वांत श्रेष्ठ मनोमनी ठसलेली
एकोपा जपून एकत्र सहकुटुंबाच्या
संस्कारांची शिदोरी ग्रंथात पेरलेली...
बदलत्या काळानुसार शिक्षणाचा
पवित्रा विचारांना स्वीकारण्याचा
असावी साथ आधाराची या बंधूंना
मार्ग सर्वांसोबत खुला जगण्याचा...
संविधानाचा सर्वधर्मसमभाव जपून
सर्वांसाठी बंधुता निर्मळ मनी पेरावी
शुद्ध विचारी माणसास आपले मानून
आधी माणुसकीची पवित्रता जपावी...