पूर
पूर
वाट पाहता आलास परी अक्रोशीत झाला,
आयुष्यभराची कमाई एकटाच घेऊन गेला.
भीती वाटत आहे तुझी, नाही छपराला जागा,
घरी थांबलास माझ्या तिकडे सागराला दगा.
साथ हवी आहे तुझी बारा महिने तेरा काळ,
परी अशी का कोपली ही निसर्गाची नाळ.
माझ सोड मी पळेल ही पण मुक्यांची काय दैना,
सगळा गाव गेला वाहून मग राघूची कशी वाचेल मैना?
कोणी पळतय पडतय मरतय चालू आहे संघर्ष,
आशा नाही सोडली पुन्हा चालू होईल नवीन वर्ष.
रोजी रोटी शेती बाड़ी सोबत नेलस सगळ घर,
शेवटी एकच इच्छा शेतकऱ्यांची काळजी कर.
