पुरस्कार
पुरस्कार
प्रयत्नांच्या पायघडीवर
यशाची पेरणी झाली,
खैरात पुरस्कारांची
आपसूकच आली...
मूल्यांकन असे हे
अचूक कर्यप्रणालीचे,
यशस्वी वाटचालीवर
क्षण बहरले सन्मानाचे..
व्यासपीठावर शान वाढता
अंगोपांगी सुख बरसले,
पुरस्काराच्या छावणीतून
शिल्डही सहजच हसले..
खऱ्या पुरस्काराला कधीच
अहंकारवात शिवत नाही,
नम्रता अंगोअंगी दिसे
मीपणा टिकत नाही...
विक्रीची खैरात कधीच
मनःशांती देत नाही,
पुरस्काराची हवा अशी
पैशाने बहरत नाही....
