पुरे झाली आता ऑनलाईन शाळा
पुरे झाली आता ऑनलाईन शाळा
पुरे झाली आता ऑनलाईन शाळा
आम्हाला खूप आलाय कंटाळा
सांगा आम्ही शाळेत कधी जाणार
कधी आमच्या मित्र मैत्रिणींना भेटणार
कंटाळा आलाय, बसून नुसतं घरी
मारायची आहे, शाळेच्या बस मधून फेरी
शाळेत जाऊनच करायचा आहे अभ्यास
तिथेच द्यायची आहे परीक्षा आणि व्हायचे आहे पास
मित्रांबरोबर खूप खूप खेळायचे आहे
एकमेकांच्या डब्यातले चाखायचे आहे
पुरे झाली आता करोनाची भीती
शाळेत पाठवा, स्वीकारा ही विनंती
