STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

4  

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

पुन्हा नवा झोका

पुन्हा नवा झोका

1 min
267

चल सखे पुन्हा एकदा

नव्याने तोच डाव मांडू

निसटून गेलेले क्षण सारे

एकेक करून वेचून घेऊ


काट्यासम टोचले जे

शब्द तुझ्या मनाला

हळुवार उपटून काढताना

आत्मविश्वासाचे मलम लावू


नको अशी खचून जाऊस

मुठीत तुझ्या आभाळ आहे

पंखांना झालेली जखम ही

कालांतराने भरणार आहे


रूढी परंपरा उपेक्षांच

ओझं किती वाहणार आहेस

रडून रडून आटलेत तरी

अजुन किती अश्रू ढाळणार आहेस


लावुनी सारी हिम्मत आता

पुन्हा नवा झोका घे

जाऊ दे उंच झोका तुझा

स्वप्नांना बहर येऊ दे

स्वप्नांना बहर येऊ दे.....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational