STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

पुन्हा एकदा एकसंघ भारत

पुन्हा एकदा एकसंघ भारत

1 min
15.6K


नाहीच कळणार तुला

प्रेमाची भाषा

त्यामुळेच तर

तुझी ही दशा झालेली


आता तरी सोडशील का रे

तू व्यर्थ भ्रमंती

की ओढवून घेशील पुन्हा

स्वतःची अधोगती


आपलं परकं तुला

अजूनही कळत नाही की

की तुला समजूनच घ्यायचं नाही

असंच जगायचंय आयुष्यभर दिशाहीन


बुद्धी गहाण ठेवून

कुठवर वागणार आहेस ?

त्यांच्या इशाऱ्यावर धोंडा

कुठवर मारणार आहेस ?


अरे ! जग हे सुंदर, प्रेमळ

सुजलाम् सुफलाम् तुला बनवायचं आहे

रक्तरंजित क्रांती नव्हे तर

शिवरायाची शिवशाही आणावयाची आहे


उठ मावळा तू जागा हो, क्रांतीचा धागा हो

अठरापगड जरी आम्ही, भारतीय आम्ही

जातीभेद, धर्मभेद, प्रादेशिकता विसरुया

पुन्हा एकदा एकसंघ भारत घडवूया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational