Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

पुन्हा आला हा हिवाळा

पुन्हा आला हा हिवाळा

1 min
194


पुन्हा आला हा हिवाळा,

बघ तु घालून दिलेला बाहूंचा स्वेटर,

आजही घातला आहे,

म्हणूनच असेल कदाचित थंडीचा ,

जोर जाणवत नाही...


आठवते मला अजूनही ,

गुलाबी थंडीत वाफाळलेला टपरीवरचा चहा,

ओठांना लावताच मिळालेली उब ,

डोळ्यांनी डोळ्यांना पाजलेली धुप,

पेशी पेशीत प्रेमाची उब विसावलेली...


आणि एक राहीलच कदाचित,

तेव्हाही हिवाळाच होता,

जेव्हा तु माझा होऊ शकणार नाही,

हे फक्त सांगायला भेटलास ,

गारठले होते हात पाय ,

शब्दही फुटत नव्हता मग ,

कसली ती थंडी शिरली,


थरथरायला झाले मी,

वाटे तु पुन्हा घालावा तुझ्या बाहूंचा स्वेटर,

जसा तेव्हा घातला होता ,

पून्हा त्याच टपरीवरचा चहा घ्यायचा होता,

पेशी पेशीला प्रेमाची उब हवी होती पण,

थंडी कडकडीने अंगात भरली ,

गारठून गेले सर्व, गारठले जग माझे,

आणि फक्त हिवाळाच स्मरणात राहीला कायमचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract