STORYMIRROR

Arun Gode

Comedy

3  

Arun Gode

Comedy

पती मेळावा

पती मेळावा

1 min
240

सर्व कंटाळलेल्या,वैतागलेल्या पतींनी मनी ठाणले,

एक मताने सर्व पतींना खुले आव्हान केले,

पत्नीच्या कटकटीचा उपाय कशे शोधावे,

यासाठी एक जागतिक सम्मेलन बोलवावे.


प्रत्येक वयोगटाच्या, स्तराच्या पतींचा कल शोधावा

आपले विचार, अनुभव अल्प अवधीतचं ठेवावा,

ही संधी मेळाव्यात सर्वंच पतींना असावा,

कटकटींच्या मुख्य कारणाचा खुलासा करावा.


सर्वांच्या विच्यारांचे सखोल आकालन करावे,

गठित समितीने निचोड एक मताने दावे,

कटकटींचे वैज्ञानिक कारण पण शोधावे,

अनुवांशिक अभीयांत्रिकीच्या बाजुने पण बघावे.


ठोस निर्णयावर प्रस्ताव एकमताने स्वीकारावा,

कटकटी निवारण बिल मसोदा संसदेला पाठवावा,

आपल्या सर्व प्रतिनिधिला तसे आव्हान करावे,

कटकटी निवारण बिल ध्वनी मताने स्वीकारावे.


कायद्या मध्ये अकारण कटकटीला दंड असावा,

पत्निला चोविस तासात फक्त एकच संधी द्यावी,

संधीच्या उल्लंघनावर कठोर शिक्षा असावी,

पण हा अधिकार फ्क्त पतींचाच असावा. 


ठरावाला मेळाव्यात स्वीकृति एक मताने मिळाली,

ठराव्याच्या मसोद्यावर आता स्वाक्षरीची वेळ आली,

समितीच्या सदस्यांनी अध्यक्षानां सहीसाठी निवेदन केले,

सही करण्याच्या आधीच अध्यक्ष भितीने स्वर्गवासी झाले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy