STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर

1 min
1.8K

प्रयत्नांती परमेश्वर


ध्येय गाठण्यासाठी करायची

पराकाष्ठा नेहमी प्रयत्नांची

स्व-अध्ययन,सरावाबरोबर

जीवघेणी परीक्षा संयमाची।


अपयश वारंवार आले तरी

खचून जायचे नाही मुळी

पुन्हा, पुन्हा प्रयत्न करून

ध्येय गाठायचे निश्चित वेळी।


जगणे हीच एक स्पर्धा

सुखापाठी धावायचे व्यर्थ

आपणच आपले ठरवावे ईप्सित

स्पर्धा जगासंगे वाजवी यथार्थ।


प्रत्येक पायरीवर अपयशाच्या

नव्या उमेदीने करायची सुरूवात

यश हमखास येईल वाट्याला

उज्ज्वल भविष्याची जणू रूजवात।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational