प्रयत्नांती परमेश्वर...
प्रयत्नांती परमेश्वर...
आज जरी कठीण आहे वाट ,
हळू हळू चालुया धिर धरूनी ,
उदया येईल सपाट सोपी वाट,
प्रयत्नांची कास धरूनी ...
निराश होऊनी कधी ,
जेव्हा अंधार पडला होता,
काजव्यांच्या कवडस्यानेही,
प्रकाश पाडला होता ...
एक एक दिवसांची,
एक एक झुंज होती ,
जिंकता जिंकता हरले ,
हरुनही जिंकली होती ...
साध्य होईल ते मला,
जे मी ठरवले आहे ,
थेंबे थेंबे तळे साचे,
प्रयत्नांती परमेश्वर आहे...
