प्रयत्न तर करा
प्रयत्न तर करा
टेकवले डोके तुझ्या उंबरठ्यावर,
हरल्यागत होते चालतांना,
थरथरले पाय थरथरले ध्येय,
मार्ग दाखव तु रमना...
निर्धार केला विश्वास ठेवला,
सकटांनाही सामोरी जाताना,
हतबल झाले डोळे खचले,
मार्ग मिळेना तुझा श्रावणा...
संघर्ष पाचविला पुजलेला,
कधी नव्हे तो चाखला खातांना,
काय ? करू कुठे जाऊ प्रश्न माझा,
मार्ग तुझाच या नयना..
बंद डोळ्यात प्रकाश उजाळत,
तु वदला अंतरंगी बोलतांना,
प्रयत्न तर करा पुन्हा एकदा,
मार्ग हाच माझ्या मना...
