पर्यावरण
पर्यावरण
सुंदर हे पर्यावरण
करू या त्याचे संरक्षण
हिरवीगार झाडें छान
स्वच्छ नद्या
टुमदार पहाड
घनदाट जंगल
जनावरांचा निवास
पक्षांचा किलबिलाट
सुंदर हे पर्यावरण
करू या त्याचे संरक्षण
लावा झाडें जगवा झाडें
स्वच्छ ठेवा नद्या नाले
पोखरू नका पहाडांना
थांबवा जंगलतोड
थांबवा कत्तल जनावरांची
ठेवा मोकळे आकाश पक्षांना
सुंदर हे पर्यावरण
करू या त्याचे संरक्षण
