पर्यावरण गीत
पर्यावरण गीत
वृक्षारोपण हे नित्य करावे
एक-एक झाड लावूनि आपण पृथ्वीला वाचवावे.......धृ
झाड असे सच्चे मित्र
संवर्धनाने बदलू चित्र ला- ला-ला
धरतीचे सुजाण पुत्र
जपती निसर्ग सूत्र
तुमच्या माझ्या विचारांतून साकार व्हावे.............१
वर्षाराणी हिरमुसली
वृक्षतोडीने ती रूसली
धरणीमाता व्याकूळली
पाण्यासाठी आसुसली
झाडे लावताच खुदकन हसली,वृक्ष गीत गावे........२
फळे-फुले,औषधी मुळी
ऑक्सिजन देई वृक्षवल्ली ला- ला- ला
झाडांमुळेच हिरवळी
मिळे आम्हांस सावली
झाडे लावून,झाडे जगवून नाते जोडावे.............३
कार्बनडायाक्साइडचा धूर
प्रदूषणाचा हा असुर
हरित क्रांतीचा नवा सूर
धरा करू हिरवीगार
या मातीला,या निसर्गाला प्रेमाने जपावे.......४
