STORYMIRROR

Sandhya Vaidya

Inspirational Others

3  

Sandhya Vaidya

Inspirational Others

प्रवासी

प्रवासी

1 min
183

अवघड वाटेवरचा प्रवासी 

 पुढे पुढे तो निघाला

कधी पोटभर कधी उपाशी

मार्गावर तो चालला...१


मजल दर मजल भरधाव

थांबेना तो क्षणभर

ध्येय प्राप्ती धरलेली हाव

कमी होईना कणभर...२


 पोचायचे वेळेत पूर्ण प्रयत्न

त्यासाठी सोडले गाव

एक एक पाऊल चढून गेले

सारे रंक आणि राव...३


शिकस्त हीच प्रगती पथाची

असे गुरुकिल्ली थोर

उच्च पदावर जाता जाता

प्रयत्न असती घोर...४


मिळेना इथे सहज काहीही

जीवन प्रवास कठीण 

खडतर असो सोपा तरीही

सुखासाठी तो साहीन...५


लक्ष ठेवत ठाम धेय्यावर

निघाली ही स्वारी

आयुष्याच्या चढ उतारावर

शोधत औषधे खरी...६


जिथे तिथे लागली शर्यत 

कोण पुढे कोण मागे

चढती अश्वारूढ होत पर्वत

विकासाचे घेत धागे...७


मार्गदर्शक असे तो रस्ता

असती खाच खळगे

अनुभव हाच खरा शिक्षक

शहाणे होती मुलगे...८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational