STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

प्रत्येक कविता जखमी

प्रत्येक कविता जखमी

1 min
233

सारेच म्हणतात कविता असते हुकमी

तरीही होते प्रत्येक कविता माझी जखमी


प्रतिभेच्या उदरातून शब्द देतात मला हमी

शोधून काढतात अवलिये त्यातही कमी.


मनाचा आवाज कविता, नसते राव बातमी

मनाशी संवादाची एक संधी असते नामी.


प्रसवते एक कविता शब्दातून येत असते एक उर्मी

हृदयी पोहोचण्याआधीच नका करु तिला जखमी.


मान्य, होते जरी रोज कविता माझी इथे जखमी

पुन्हा पुन्हा घेत राहीन रोज नवनवी जोखीम मी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational