प्रत्येक भारतीयाचा तू अभिमान
प्रत्येक भारतीयाचा तू अभिमान
प्रत्येक भारतीयाचा तू अभिमान
खेळातून तू रचलास इतिहास,
गवसणी घातलीस उंच गगनास, झळाळी दिलीस तू सुवर्णास,
मनामनात जागवलास आत्मविश्वास, भारतमातेचा सुपुत्र तू गंगा,
त्रिखंडात फडकवलास तिरंगा, भारतीयांचा आहेस तू गर्व,
तुझ्या कीर्तीचे तेवो अखंड पर्व, लक्ष्मीमातेस प्रिय असे पंकज,
तद्वत प्रिय आम्हास नीरज,
चढवलास साज कार्यकर्तृत्वाचा, उमटविलास ठसा अधिराज्याचा,
जागवला आत्मविश्वास मनामनात, वाढवला सन्मान जनमनात,
वाटे धन्यता तुझा वारसा जपण्यात, खेळाडू बनण्याचे
स्वप्न जपले हृदयात!! खेळाडू बनण्याचे स्वप्न जपले हृदयात!!
भारत माता की जय !!
