प्रतिमा
प्रतिमा
महत्वाच काहीतरी शोधताना, आठवण लागली हाताला.
कधी एकदाचे सगळे पाहीन, प्रश्न पडलाय वेळेला.
वेळ होतीच तशी, खूप हौसेने अट्टाहास व्हायचा.
कैमेरा वाला आला की, कार्यक्रमात उत्साह संचारायचा.
धावत्या या जगात, आठवणी पकडायचे पर्याय आहेत खूप.
आधी तस नव्हत, म्हणून एक एक आठवण जतन करायचो गुपचुप.
आली आठवण तर, घाई डोळे भरून पाहण्याची.
लगोलग बातचीत नाय व्हायची, म्हणून डोळे मिटून रडण्याची.
सगळ आठवत जाते, परिस्थिती वय मर्यादा वेळ.
कितीतरी पुढे निघून आलोय, सारा दुनियादारीचा खेळ.
खेळच होता तो, आठवणी सुख दुःख प्रसंग सारे जपण्याचा.
आज त्याच फोटो ला कंटाळा आलाय, अडगळीच्या खोलीत लपण्याचा
कितीही लपवले तरी, चमक काही कमी होनार नाही.
सगळेच कुतुहलाने पाहतात, भूतकाळाच्या अंधाराची घाई.