माझे मरण.....
माझे मरण.....
आज सर्व रडत आहेत माझ्यासाठी
पण मी फक्त जगत होतो तुझ्यासाठी
तुला दिलेलं वचन मला पुर्ण करायचं होतं
पण काळ असा आला मला जाणे योग्य वाटत होतं
तुझ्या पासुन मी दूर राहून कसा जगू
तुच सांग
मला सुध्दा लाल करायची होती माझ्या नावाची तुझा भांग
घरचे सर्व रडत होते तरी वाटत होत परकं
आज
... कुठे गेला म्हनुन रडत होते सारखं
आज माझे होते सर्व फक्त होती तुझी कमी
माझ्या फक्त नश्वर देहाची उरली होती (डमी)
गर्दी खुप जमली तेव्हा मला आंघोळ घातली होती
आज नवरदेवासारखी कपडे सुध्दा घातली होती
माथ्यावर माझ्या कुनी तरी लावला मोठ्ठा टिक्का
त्यावर बांधला सुतळीने एक रुपयाचा शिक्का
मला नव्हत माहीत आज काय होत...होतं
वैऱ्याच सुध्दा प्रेम आज माझ्यावर पडत होतं
सनई चौघडा नव्हता तेव्हा डफडी झाली सुरु
माझे जिवलग मित्र म्हणाले नेऊ नका
आम्ही वाट आडवी धरु
आई माझी ओरडत होती थांबा नका घाई करु लेक माझा जागेल
गर्दीतुन कुनी तरी म्हनालं खुप वेळ झाला आणखी किती वेळ लागेल
ज्यांच्या सहवासात माझं गेल होत बालपण
त्याच चार लोकांनी घेतल खांद्यावर आज पण
माझ्या बहिणीचे मुल होती खुप बारकी
आमच्या मामाला नेऊ नका म्हनत होती सारखी
भाऊ पण माझा मोठा होता फार
त्याच्या डोक्यावर आला आता पुर्ण घराचा भार
स्मशानात जातांना लोक घाई खुप करत होते
समोर दोन माणसं सरण माझं सजवत होते
माझ्यातील कुणी तरी आज मला पाणी सुध्दा पाजलं
सरणावर ठेवल्यावर मला माझं अगं खुप भाजलं
चिता भेटत होती देह माझा शहारत होता
आज माझ्या सरणाला पाहून आकाश सुध्दा रडत होता
माणस सुध्दा परतली घरी निघून जायला
येवढ्या मोठ्या गर्दीतुन कुणी मला परत नाही पाहीला
तिसऱ्या दिवशी स्मशानात आले माझी राख घेण्यास
माझ्यातिल कुणी तरी असावा म्हनाला घेऊन जाऊ पाण्यात
पाण्यात नेल्यावर सुध्दा मला फेकत होते
हाडे लांब फेक मिळेल त्याला शांती अस म्हणत होते
माझ्या दशक्रियेसाठी खुप माणसं जमली
ब्राम्हनाला बोलाऊन पिंड कावळ्याला टाकली
आला दिवस तेरव्याचा माझ्यासाठी नैवेद्य गोड केला
नैवेद्य - धुप घेऊन कुनी पाहूणा स्मशानात गेला
मरणाचा कार्यक्रम माझा आज पुर्ण झाला
हा कवि मात्र लोकांच्या फक्त आठवणीत राहीला
फक्त आठवणीत राहीला..........
