तक्रार
तक्रार
तक्रार मांडते का आभाळ सागराशी
आयुष्य खेटले त्याचे आज वादळाशी
ताऱ्यास झुंजला आभाळात काजवाही
वातीस तेल द्यावे बोलेन माणसाशी
धोक्यात माणसाने सोडून गाय नेली
आरोप लावतो तो दिव्यांग वासराशी
आसूसल्या मनाला आधार प्रेम देई
गंधाळल्या फुलांनो खेळाच पाखराशी
ही आसवांची गाथा सांगेन या जगाला
बोलायचे मनाचे राहीन साजणाशी