STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

ही वाट आयुष्याची...

ही वाट आयुष्याची...

1 min
359

ही वाट आयुष्याची ,

वळणा वळणाची आहे ,

चालताना थांबत नाही ,

अन् थांबली तर संपत आहे ...

आज सोबत मी असेल ,

उद्या वाटसरू दुसरा ,

वाट तीच असेल जरी ,

काट्यावरी चालणारा खरा ...

रोजचा चेहरा नवा ,

वाटच जणू खुणावती ,

वाटेवरून चालतांना ,

एका मागून एक येती जाती ...

दिवस-रात्र उगवेल मावळेल ,

चंद्र सूर्य तेच आहे ,

तू नाही मी नाही उद्या ,

जमीन वारा तेच आहे ...

ही वाट आयुष्याची ,

वळणा वळणाची आहे ,

चालताना थांबत नाही ,

अन् थांबली तर संपत आहे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract