नाट्य
नाट्य
जीवन नाट्य भलतंच अवघड
होत नाहीत दुःखं उघड
अडचणींची काटेरी सगळी वळणं
जागोजागी जगण्याचे नियम पाळणं
खोटेपणा खणखणीत वाजतो इथे
लाज असलेलाच लाजतो इथे
विश्वासावर चालत नाही कांही
स्वार्थाशिवाय मिळत नाही कांही
खरे उशीराने उदयास येते
खोट्या लबाडीचे सोने होते
संधी मिळते फक्त वशीलेबाजांना
रांगेत स्थान इथे गरीबांना
जगण्याचा हेतू कोणास कळला
जो तो वाममार्गी वळला
संस्कृतीला विसरून हरवला माणूस
जीवनाने चक्क बदलली कुस
खोटा मोठेपणा दाखवत जे आले
त्यांचे जगी हसे झाले
सुख दुःख कालचक्र साहजिक
माणसा तू जगायला शिक
किती लिहावे तुझ्यातले गुण
दुर सार एकदाचे अवगुण
जीवन नाट्य खरे वाटावे
असे पात्र तू वठवावे