प्रतिक्षा
प्रतिक्षा
प्रतीक्षा का करायला लावतोस...?
प्र तीक्षा का करायला लावतोस...?
ति रक्या चालीने का चालतोस...?
क्षा र का उगाच मनी पेरतोस...?
का गप्पकन गायब होतोस...?
क स आहे,डोळे भरून मला
रा ग बाजूस सारून तुला पहायचे होते
य दाकदाचीत नरमशील म्हणून
ला डी गोडीने जरा आज विनवायचे होते....
ला ज वाटत होती माझी मला पण
व रकरणी धैर्य मी गोळा केले होते
तो आत्मसन्मान बाजूस सारून वेड्या
स रळ नतमस्तक व्हायचे होते...
पण तू खरोखरच मनकवडा निघालास
क्षितीजाला नस्पर्षताच गायब झालास
धुक्याची चादर पांघरून नभात
पटकन नजरे आड होऊन निघून गेलास....
नवल वाटले मला म्हणून सांगतो तुला
असे चमत्कार बाबा दाखवू नको
पुन्हा न सांगता तू असे कधी करू नको
व्हिडीओ करण्याचा बाबा चान्स घालवू नको...
हल्ली प्रत्येक गोष्टीला इथे पुरावा लागतो
तुझ्या किमयेवर विश्वास ठेवायला आधार लागतो
आता वेड्या पुन्हा वाट पहावी लागणार
उद्याच्या सांजेची प्रतीक्षा मला करावी लागणार...
