STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

प्रतिक्षा बळीराजाची

प्रतिक्षा बळीराजाची

1 min
268

मन झाले हो चिंतित

आता शिवार तापलं

लई भेगाळली भुई

द्येवा कवा गंधाळलं ?  (1)


लागे नजर आभाळी

जाती नक्षत्रे कोरडी 

नद्या विहीरी आटल्या

पिके पडली उघडी   (2)


फक्त एक मार्ग दिसे

मला आता सुटण्याचा

फास घेताच सुटेल 

प्रश्न आयुष्यभराचा  (3)


गुरेढोरे भुकेलेली

पोरं चेहरे टाकून

अशामधी मृत्युसुद्धा

कसा घेईल वेढून ?   (4)


असे जगणे-मरणे

देवा अवघड झाले 

कर वर्षाव रे आता

प्राण कंठाशीच आले  (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract