STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

4  

Sanjay Gurav

Inspirational

परतीच्या वाटा

परतीच्या वाटा

1 min
467

चलतीच्या वाटेवर 

चालू अविरत खेटा

गाठावे कसे ठिकाण

हाच पेच हो मोठा.


जपले जरी पाऊल

मोडतोच एक काटा

निश्चित वाटेलाच कसा

फुटतो नेमका फाटा.


चालत्या बैलाच्याच 

पाठीवर पडतो सोटा

आभासाचे दिवाने इथे

डौल त्यांचाच मोठा.


वाट अविरत चालावी

नको बडेजाव खोटा

खूपच धुसर असतात

इथे परतीच्या वाटा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational