Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

पृथ्वी वाचवा

पृथ्वी वाचवा

1 min
475


कविता - चला वाचवू अवनीला


अरे माणसा माणसा

ठेव आता तरी भान

झाडा विना जिणं नाही

जरा असू दे रे जाण  !!१!!


घाव घालतो किती

करती रुदन ते तरु

आसू पुसण्या धरेचे

मनी ध्यास आता धरू !!२!!


चला वृक्ष लागवड करू

मुठी ओंजळीनं त्याला

पाणी आता भरू

जोपासू त्याला अन् कुंपण ही करू  !!३!!


वणवा लागला कानना

झाले भस्मसात तरु

वन बहरण्या पुन्हा

बीज रोपण ही करू !!४!!


चला वाचवू पृथ्वीला

श्वास मोकळा घेऊया

प्राण वायूची निर्मिती

सारे मिळून करूया  !!५!!


बघ दडला रे झाडात

किती स्वस्त प्राणवायू

घाव नको रे तू घालू

प्राण जाताना नको रे तू पाहू !६!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational