STORYMIRROR

Varsharani Sarawade

Inspirational

3  

Varsharani Sarawade

Inspirational

विषवेल

विषवेल

1 min
13.7K


म्हैसाळ गावठाणी राहून आज आले

वृत्ती नराधमांची पाहून आज आले

 

माणूसपण हरावे कृत्त्यास त्या अघोरी

दुःखात पातकाच्या नाहून आज आले

 

विषवेल ती खुन्यांची,फोफावली विखारी

श्रद्धांजली मुक्याने वाहून आज आले

 

कोषातल्या मुलीच्या का मरण या नशीबी?

जखमा तनामनाच्या साहून आज आले

 

कोमेजल्या काठावरी तळ्याच्या कळ्या त्या

अंगाई झोपल्यांना गाऊन आज आले

 

लवकर दयाघना तू धावून येत नाही

मी दोष व्यवस्थेला लावून आज आले

 

आक्रोश दाबलेला,जालीम या रुढींनी

ठिणगी परंपरेला लावून आज आले!

 


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Varsharani Sarawade

Similar marathi poem from Inspirational