प्रणाम आई
प्रणाम आई
प्रणाम तुजला हजार आई
घराघरातील बहार आई ....१
हृदय तळाशी सदैव जपते
तुझेच मंगल विचार आई......२
उन्हात छाया धरी शिरावर
दयाघनासम उदार आई.....३
अखंड झिजली आम्हास्तवे तू
करुन तमावर प्रहार आई......४
तिन्ही जगाचा असेल स्वामी
तुझ्या विना तो भिकार आई.....५
कशास जाऊ प्रयाग काशी
तथागताचा विहार आई.....६
सुखात न्हाते तुझ्यामुळे मी
नमेन चरणी त्रिवार आई.....७
