STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

4  

Rohit Khamkar

Abstract

प्रसंग

प्रसंग

1 min
347

प्रसंग बाका उभा राहीला, अक्कल झाली छोटी

प्रयत्नांचा पहाड फोडतो, स्वप्न होती मोठी


पळतो आहे जोमाने, थांबा कुठलाच नव्हता

शेवटाजवळ कायमच, प्रवास फक्त संपत होता


सगळं शांत तिथे, श्वासांचा आवाज होता

पापणी लावती तोच, स्पष्ट असा नजारा होता


भोवती अनोळखी गर्दी, आणि स्पर्धकांचा मेळावा भरला

कित्येक अपयशाच्या रूपानं, अर्धा का होईना प्रवास सरला


मध्यात आता आलो होतो, पुढचे मागचे समांतर सर्व

अहंकार आडवा येत होता, सगळा प्रवासाचा गर्व


विचलित झालो असा, सावरण्याआधी पडलो

जिंकण्याच्या शर्यतीत, स्वतः स्वतःशीच नडलो


थोडा वेळ नक्कीच गेला, पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी

प्रसंग हा होणेच होता, मार्ग पुन्हा मिळण्यासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract