प्रश्न
प्रश्न
घरात लाईट गेली
सर्वत्र अंधार झालं
आपण चाचपडत असतो
आपल्याच स्वतःच्या घरात
ज्यांच्या घरात नसते
कोणताच लाईटचा दिवा
ते कसे राहत असतील ?
असा विचार मनात आलं
की सहज प्रश्न पडतो.....
चार भिंतीच्या आत आपण
आत्ता वावरतो किती सुखरूप
ऊन थंडी, वारा पाऊस
याच्यापासून होते बचाव
ज्यांना नसतात चार भिंती
ते कसे राहत असतील
असा विचार मनात आलं
की सहज प्रश्न पडतो.....
स्वयंपाकासाठी वापरतो आपण
गॅसची चूल नसता इंडक्शन
त्यावरच झटपट होतो आपला
तयार दररोजचा जेवण
उघड्यावर स्वयंपाक करणारे
ते कसे जेवत असतील ?
असा विचार मनात आलं
की सहज प्रश्न पडतो.....
जमीन ज्यांचे अंथरून अन
आकाश ज्यांचे आहे पांघरूण
ऊन, थंडी असो वा पाऊस
त्यांना नसते कशाची कुरकुर
अश्या विपरीत परिस्थितीत
ते कसे जगत असतील
असा विचार मनात आलं
की सहज प्रश्न पडतो.....
अश्या लोकांकडे पाहून
मनात नेहमीच प्रश्न पडतो
त्यांचे जीवन असेच
भटकण्यात फिरण्यात
संपूर्ण आयुष्य त्यांचे संपते
ते कसे जीवन जगतात
असा विचार मनात आलं
की सहज प्रश्न पडतो.....
