प्रणाम कोटी कोटी
प्रणाम कोटी कोटी


भारतमातेला प्रणाम कोटी कोटी
आम्ही जगू ही, मरू ही देशासाठी...
हिंदू, मुस्लिम सारेच भाऊ भाऊ
आम्ही एकच सदा बंधुभावाने राहू,
दावू समतेची ताकद किती ही मोठी ...।।
लढू शत्रूशी पर्वा कशाची न करू,
भारतमातेसाठी मरुन पुन्हा अवतरु,
करु सारे काही जे देशाच्या हितासाठी...।।
या मातीत जन्मले कित्येक शूर विर
लढले शौर्याने, गोळ्या झेलले छातीवर,
मरताक्षणीही 'जयहिंदचा' नारा ओटी...।।
एक जुटीने नांदा सारे देशात,
नको भेदभाव द्या सोडून जात पात,
नाही आम्हा पुढे शक्ती जगात मोठी ...।।
मंत्र ऐक्याचा साऱ्यांनी ध्यानी ठेवा,
प्रत्येकाला तो राष्ट्राभिमान हवा,
नको मरणाची भिती या देशासाठी...।।
आम्ही जगू ही मरू ही देशासाठी...।।