प्रकाशवाटा...
प्रकाशवाटा...
अंधारातून प्रकाशवाटा धुंडाळीत मी राहताे,
पाण्यासारखे प्रवाही स्वच्छंदी जीवन जगताे...
किती कमवली मालमत्ता कमीच ती पडणार,
शाबूत ठेवताे नितीमत्ता माणसं ती कमावणार...
प्रकाशवाटा स्वभावाच्या निखारीत मी चालताे,
न्यायाच्या व सत्याच्या बाजूने मी नेहमी वागताे...
काय केले किती केले मांडू नका लेखाजोखा,
स्वार्थाच्या बाजारात जागाेजागी बसलेत बाेका...
