प्रकाशपर्व
प्रकाशपर्व
काळोख प्यालेली रात्र,
त्या गडद काळोखी निराशेची
चादर ओढल्यागत...
ती निःशब्द घालमेल...
मनाचं कुरतडणं...
मग सुरू होतो प्रवास,
तो प्रकाश कण शोधण्याचा!
शोधता शोधता गवसतं...
एक एक कवडसा मिळून समोर येतं,
आशादायी प्रकाशपर्व..
सूर्यास्तानंतरचा सूर्योदय अन्
निराशेच्या क्षितिजावर उगवणारे
हे आशादायी प्रकाशपर्व..!
मोहवणारं...
मनाला स्पर्शून घेणारं...
व्यापून उरणारं....!
