Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर

प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर

1 min
187


जन्मा येणे दैवा हाती

करणी जग हासवी |

बाबासाहेबांचे समग्र जीवन 

सन्मार्ग जगाला दाखवी | |१| |


१४ एप्रिल रोजी रामजी घरी

जन्मा आले जणू १४वे रत्न | 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार 

ठरले भविष्यातील भारतरत्न | |२| |


अस्पृश्यतेचे घणाघाती घाव झेलून 

दिले दलित समाजाला नव संजीवन |

अहोरात्र करून काम ,संघर्षाने प्रज्ञासूर्याने

अर्थपूर्ण ठरवले आपले स्वजीवन | |४| |


ग्रंथांचा करून विलक्षण संग्रह

अखंड ज्ञानार्जन विपुल लेखन |

दीन दलितांचे कैवारी होऊन

बौद्ध धर्माचा स्विकार करुन | |५| |


स्त्री पुरूष समानतेचा केला विचार

हक्कांचा संविधानात समावेश करुन |

त्या आग्रहासाठी प्रसंगी पदाचाही 

दिला होता तुम्ही त्याग करुन | |६| |


आजही समाजाला मार्गदर्शनाची

व पंचशीलांची नितांत गरज आहे |

व्यसन व निष्क्रीयते पायी समाज

अधिकाधीक रसातळाला जात आहे | |७| |


तुमचे आदर्श उंची व व्यथा

त्यांना आजही नाही कळली |

तुमच्या आचार विचारांकडे

त्यांची पावले नाही वळली | |८| |


तुमच्या १३०व्या जयंती वर्ष दिनी

सारे करतो प्रणाम वारंवार |

परतून यावे तुम्हीच पुन्हा बाबा

होऊन समाजाचे तारणहार | |९| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract