प्रिय सखी.. आनंदाने जग जरा...
प्रिय सखी.. आनंदाने जग जरा...


*प्रिय सखी,**माझं जरा ऐकतेस ?* *वय तुझे 30-35-40 झाले**आताही तू सुंदर दिसतेस *
*मुलं, नवरा, संसार* *यातच तू गुरफटून गेली**स्वतः कडे लक्ष देण्याची**वेळ आता आली*♀️
*मुलं मोठी झाली**लोक काय म्हणतील**हाच विचार करून**किती कुढत बसशील*♀️
*मान ताठ वर कर**शोभेसा हलका मेकअप कर**सावधानतेने चार**मित्र-मैत्रिणी जवळ कर*
*चौकटीत नको राहू* *बाहेर जरा पड**बंधन सारे झुगारून**स्वतःला हवी तशी घड*
*माहेर सोडून**सासरी आलीस**दिव्यातल्या वाती प्रमाणे**जळत गेलीस*
*तुळस माहेरची**सासरी रुजवता येते**मन मोकळ
जगूनही**मांगल्य जपता येते*
*सारेच दिवस**सुखाचे नसतील**तुझे ही काही**दुःख असतील*
*सारी दुःखे जगा समोर**जाहीर करू नको**प्रतिस्पर्ध्याच्या फुग्यामध्ये**हवा भरू नको*
*आपले कोण परके कोण**खात्रीने जाणून घे**खात्रीच्या खांद्यावर**दुःख हलके करून घे*
*परी बनून जेंव्हा तू**मस्तीत फिरशील**बागेतली फुलेही**तुझ्या सवे हसतील*
*फुलां कडून तेंव्हा तू**सुगंध मागून घे**फुलपाखरां कडूनही* *विविध रंग सांडून घे*
*वाऱ्याच्या हिंदोळ्यावर**हलके हलके डोल जरा* *शिल्पकार तू जीवनाची**आनंदाने जग जरा*