ऋणानुबंध...
ऋणानुबंध...


माझ माझं काय करतोस जरा दुसऱ्याचे ऐकून बघ कधी तरी स्वार्थ सोडून जरा परोपकार करून बघ
चार भिंतीच्या घराबाहेर डोकावून बघ जरा निसर्गाचा आनंद घे विचारांचा कर निचरा
ऋणानुबंधाने मिळते सारे असेल जरी हे खरे टिकवून ठेवणे सोपे नाही कधी पलटेल कोणते वारे
सारे दिवस सारखे नसतात क्षणात होत्याचे नव्हते करतात पायाखालची जमीन सरकून रावालाही रंक बनवतात
म्हणून म्हणते शहाणा हो राहू नको वेडा गोडी गुलाबीने हाकावा संसाराचा गाडा
ऋणानुबंध, पूर्वजन्म खरे असेल सारे काही आज तू जगून घे उद्याची कोण देईल ग्वाही
स्वतः जगता जगता दुसऱ्याना जगवायलाही शिक जन्मभर सचोटीने वाग अनर्थास कधी घालू नकोस भीक
वय तुझे कितीही होवो चाळीशी, पन्नासशी किंवा साठी जपून ठेव हृदयात नेहमी ऋणानुबंधाने पडलेल्या गाठी