STORYMIRROR

Anjana Bhandari

Others

3  

Anjana Bhandari

Others

2020 वर्षास विनवणी

2020 वर्षास विनवणी

1 min
183

*हे २०२० वर्षा......*

*सुरवाती पासूनच तू घेत गेलास, मी देत गेले.*

*देण्याची इतकी सवय झाली कि*

*देता देता जीवनातील एक वर्षच काय,* 

*तुला मी माझं सर्वस्व दिलं.* 

*शेवटच्या दिवसा पर्यंत तू लढत राहिलास* 

*मी झुंजत राहिले.* 

*वर्ष भर तुझ्या मर्जीने चालत राहिले.*

*चालता चालता जगण्याचे नवे बळ मिळाले.*

*अं.. हं...*

*तू सर्वस्व नेलेस तक्रार नाही माझी.*

*माझे हात शाबूत ठेवलेस ही मेहरबानी तुझी.* 

*जाता जाता-- आग्रह नाही पण बघ* ,

*जमलंच तर एक कर....* 

*वर्षभर दिलेल्या जखमांवर मार फुंकर.* 

*निरोप घेतांना मात्र* 

*२०२१ ला एक सांग कानात* 

*तू तरी वाग बाबा जरा प्रेमात*

*वर्षभर चालले मी तुझ्या मर्जीने* 

*पण चालू दे ना गड्या,*

आता दोन चार पावले माझ्या मर्जीने.*

*चालेल मी नव्या दशकाची नवी वाट* 

*नव्या आशेच्या नव्या स्वप्नाची प्रसन्न पहाट.*

*नव्या वर्षाचा तेजस्वी भास्कर*

*अधिक प्रकाशमान व्होवो*

*आपल्या सर्वांना नव वर्ष सुखाचे जावो.*

   



Rate this content
Log in