STORYMIRROR

Anjana Bhandari

Inspirational

3  

Anjana Bhandari

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
310

काट्यांसवे फुलतात फुले 

तशी रोज फुलते मी 

दुःखास ठेवते झाकुन 

सुखास शोधते मी 


स्वप्न जपले जे उराशी 

ते पुर्ण करतेच मी 

आशेच्या किरणावरती 

रोज नव्याने झुलते मी 


मिटता पापण्या अलगद 

डोळ्यांमध्ये स्वप्ने उतरती 

जाई जुई च्या सहवासाने 

सुगंधित होऊन जाती 


झुलते कधी वाऱ्यावरती 

कधी डुंबते पाण्यामध्ये 

राणी मी च असते 

माझ्या नशिल्या स्वप्नामध्ये 


शिल्पकार मी माझ्या 

जीवना फुलवत नेते 

श्रमाच्या हिंदोळ्यावर 

जीवन गाणे सुंदर गाते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational