मी खरच मोठा झालोय?
मी खरच मोठा झालोय?
मास्तर तुम्ही म्हणाला होतात
खूप शीक, मोठा हो
खर सांगतो मास्तर
मी प्रयत्न करणार होतो
शिकून मोठा होणार होतो
पण समाजानच शिकवलं सार
मी शिकायच्या आधीच
प्रत्येक वाढदिवसाला
आई औक्षण करायची
कानशीलावर बोट मोडत
मोठा झाला म्हणायची
मास्तर तेव्हाही वाटायचं
तुम्ही मोठा हो म्हटलं
आणि मी मोठा होतोय
या शिकण्याच्या नादात
कळलच नाही मास्तर
मोठा होता होता मी
केंव्हाच लहान होत होतो
नको त्या वयात
नको ते, नको तेव्हढ
नकळत शिकत होतो
आज कळतंय -----
शिक्षण म्हणजे काय
कळल नाही शेवट पर्यंत .
पडलोय निपचीत
सर्वजण हार घालून
करताहेत नमस्कार
बहुतेक सर्वां पेक्षा
मी मोठा झालोय.
