मी रोगावर इलाज करत नाही
मी रोगावर इलाज करत नाही


हल्ली मी
रोगावर इलाज करत नाही
रोग काय
रोज नव नवे निघतात
विचार करावा लागतो उपचार काय
एका रोगावर औषध शोधतो
तो पर्यंत दुसरा डोक वर काढतो
जनू माणसाच्या कळपात राहतो
याचा पुरावा देतो
बिना आमंत्रनाचा शिरतो भामटा
नको तिथे काढतो चिमटा
येताना कधी आढेवेढे घेत नाही
जाताना कधी सरळमार्गी जात नाही
म्हणून मी हल्ली
रोगावर इलाज करत नाही
हल्ली इलाज करतो मी माणसावर
माणसाचं बर असत
सहज सर्वत्र उपलब्ध होतात<
/span>
बरीचशी चटकन तपासून होतात
म्हणतात प्रकृति तितक्या विकृती
प्रत्येकावर साधारण एकच कृती
जरा मायेने गोंजारलं, आपुलकीने तपासलं
की अर्ध दुखणं त्यांच पळतं
लगेच उठून बसतात, कृतज्ञतेंन म्हणतात
डॉ . तुम्हाला फार कळतं
कळत बीळत काहीच नसतं
माणसं तपासण्याचं एक तंत्र असतं
ज्याला जे आवडेल तेच त्याच्याशी बोलायच
ज्याला जे आवडेल त्याच्या बरोबर तेच खायचं
मी तूझाच, तू माझाच
उगाच आपलं म्हणत जायचं
माणूस बरा होत जातो
आपला खिसा गरम राहतो.