जुन्या काळी
जुन्या काळी
जुन्या काळी माणस माणसाला धरून होती
आता सारख बंद फ्लॅट ची संस्क्रुती नसून
चिरेबंदि वाड्यात सारी एकोप्याणे रहात होती
काही भाऊबन्द्की ची तर काही नोकरीच्या बदली मुळे आलेली होती
तरी कशी रात्रंदिवस
प्रत्येकाच्या सुख दुखात अडकलेलि होती
सकाळी बाहेर पडताना कोणी
लवकर ये म्हणून म्हणत होती
तर घरी परते पर्यंत कोणी
डोळ्यात प्राण आणून वाट पहात होती
जुन्या काळी माणस माणसाला धरून होती
कार्या साठी जातांना
हातावर दही साखर देत होती
काम फत्ते झाल की पाठी वर
शाबासकी ची थाप पडत होती
हसून खेळून प्रत्येकाच्या आनंदात
सहभागी होत होती
जुन्या काळी माणस माणसाला धरून होती
कुणाच प्रेम , कुणाचा रूसवा,
कुणाचा राग , कुणाचा फतवा ,
प्रत्येकाच्या भावना जपत होती
लहानग्या पासून म्हाताऱ्या पर्यंत
सर्वांना मायेची ऊब होती
प्रत्येकाच जीवन एक खुली किताब होती
जुन्या काळी माणस माणसाला धरून होती
एकाची भाजी , दुसऱ्याच वरण तिसऱ्याच कालवन
अंगत पंगत छान जमत होती
चिंगि,मिंगि , चिन्टु ,पिन्टु
सारी कशी पोट भर जेवत होती
लेकरां च्या जेवणासाठी आयांची
कधी तक्रार नव्हती
नाईट आउट च तेंव्हा फॅड नव्हत
अंगत पंगत रंगत होती
द्वेष , मत्सर , यांना दार बंद होती
जुन्या काळी माणस माणसाला धरून होती
