उत्तम वाचक सत्कार
उत्तम वाचक सत्कार
शब्द धरतात फेर माझ्या भोवती
घालतात पिंगा, तर कधी घालतात धुड्गुस
नाचतात घालून हातात हात तर
कधी करतात नंगा नाच
वर मलाच विचारतात ,
लागला का अर्थ ?
वाचताना दिसतात साधे सोपे
पण मला कळत नाही त्यांचा
नेमका अर्थ काय ?
मी गोंधळलेला पाहिला की
त्यांना आधिक चढतो जोर
पुस्तकांच्या पाना तून
फुलवतात पिसारा जणू
पावसाळ्यात नाचावा मोर
नाचता नाचता ते बदलत जातात
त्यांच्या जागा
घेऊन नवे नवे संदर्भ
मी मात्र आजुन ही शोधत आसतो
त्यांच्यातील अर्थाचे गर्भ
कोणत्या शब्दापुढे कोणता शब्द आला
म्हणजे कसा बदलत जातो अर्थ
मला कळत नाही
मी वाचत राहतो निमूट पणे
काहीच बोलत नाही
तेंव्हा शब्दच मुके होतात
फिकट पडत जातात
पाना च्या आत गुदमरु लागतात
तेंव्हा पुस्तकालाच येते त्यांची किव
पुस्तके पोक्तपणे कपाटात पडून राहतात
जात नाहीत कोणाच्या हातात
देतात तिलांजलि शब्दांना अर्थासहित
शेवटी स्वतः देतात जीव
कालबाह्य झाले म्हणून
मी मात्र पुस्तकांना रद्दीत विकून
सर्व सारवासारव करून
सभा सम्मेलने गाजवतो
उत्तम वाचक म्हणून सत्कार घेतो
