फूल तुटले : बालपण सरले
फूल तुटले : बालपण सरले
मी आईच्या मांडीवर
फूल जसे देठा वर
दूध तीचे ओठावर
खळी माझ्या गालावर
क्षणभर पडली नाही नजर
डोळा आसू काठावर
वाटे देवाने तिचे गाव
वसवले काळजाच्या बेटावर
बोट धरून चालवले
जगण्याच्या वाटेवर
हात धरून लिहिले
आयुष्याच्या पाटीवर
आठवांचे सोडत दीप
चालत गेलो दूर
प्रगतीला आला होता
जणू माझ्या पूर
तिची साद पूर्वी
यायची रोज कानावर
प्रतिसाद ही देण्यापूर्वी
जायचो मी कामावर
ती सोडी नाव चिठ्ठीची
रक्ताच्या लाटेवरती
वाट पाहे माझी की
विस्कटल्या वाटेवरती
आयुष्य तीने हे
थांबवले उंबरठ्यावर
बाळ अशीच हाक
अजून ये कानावर
आला निरोप तेंव्हा
कामाचा होता भार
सुन्न झाले शरीर
इर्षा भेटीची अनिवार
चार दिवस होती ती
लढत यमा बरोबर
करून उधारी गेली
शेवटच्या श्वासावर
पळत आलो जेंव्हा
काम सोडून सारे
घोंगावत हे
भोवती अनोळखी वारे
अंगणात झोपली दारी
हाती पाळणा दोर
बालपण सरले हे
जीवाशी लावून घोर
आता, आई माझ्या मांडीवर
जसे फूल तुटावे देठावर
घाला नियतीचा पडला
सम्पूर्ण असा झाडावर
