तुम्ही लग्नाला यायला हव
तुम्ही लग्नाला यायला हव
तशी बघायला गेल तर
ठमी आमची अगदीच डावी नाही
मान्यय् उंची तीची आहे कमी
डोळेही आहेत मिची मिची
बहुतेक देवाने ओल्या गोळ्यातच
चिटकवले असावे तीचे नाक
म्हणून बसके पण दोन छिद्र
करतात श्वास घ्यायचे काम
लग्नानंतर ची सोय म्हणून
अकलेशी आधीच फारकत
कपड्यात अंग घुसवण्यासाठी
रोज करते ती कसरत
अशी माझी ठमी
नव्हती कुठल्याच कामी
उभी केली मी तिला
लग्नाच्या बाजारी
खूप बोलावला पाव्हना
ठमी ला पसंतच पड़ना
तीच मत-- आठ ते पाच नौकरी
म्हणजे पाच नंतर बेकरी
कालचा पाव्हना म्हणते बरा आहे
वाट्सप कंमनीत अड्मिनआहे
चोवीस तास काम करतो
सर्व लोकांशी जमवून घेतो
विनयशील स्वभाव आहे
म्हणून मेंबर संख्या वाढते आहे
त्यानं ठमी ला विचारल
मेंबर होशील का ?
वाट्सप चालवशील का ?
ठमी न ठाम नकार दिला
म्हणाली मी मेंबर होणार नाही
ते काय वाट्सप बिटसप
तुम्हीच चालवा
गरज आंसल तेंव्हा
मला मागे बसवा
पाव्हना एकदम खुष झाला
रुपया नारळ करूनच गेला
वर म्हणाला पत्रिका छापू नका
निमंत्रणाचा त्यानंच घेतला ठेका
जावाई कामात खूप चपळ दिसले
तासात निमंत्रण पाठवले गेले
आता मला कामाला लागायला हव.
तुम्ही सर्व लग्नाला यायला हवं.
