प्रिय दादा (बालगीत)
प्रिय दादा (बालगीत)
प्रिय दादा
तू माझा भाऊ,
दाेघे मिळून
खावू चल खाऊ...
प्रिय दादा
मी तुझी बहीण,
सासरला मी तुला
घ्यायला येईन...
प्रिय दादा
तू काढताे खाेडी,
मग हळूहळू
लावताे लाडीगाेडी...
प्रिय दादा
खेळू भातुकली खेळ,
अभ्यास साेडून
मला मिळताे का वेळ...
