STORYMIRROR

Sarika Jinturkar

Children

3  

Sarika Jinturkar

Children

प्रिय आई

प्रिय आई

1 min
259

भाग्य माझे थोर तुझ्यासारखी निर्मळ,वात्सल्यसिंधू आई मला मिळाली  

 जन्म देऊनी आम्हा बनवले तू संस्कारी  

आभाळभर माया आणि निस्वार्थ प्रेम करणारी

 न बोलताच मनातलं सगळं काही समजणारी  


कल्पवृक्षाप्रमाणे सावली देणारी 

खचलेल्या मनास स्वअस्तित्वाची जाणीव करून देणारी प्रत्येक चूक आमची सांभाळून घेणारी 

मायेची ऊब तुझी नेहमी आम्हाला हवीहवीशी वाटणारी


प्रपंचाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलीत वाढवले आम्हास तू ममतेने 

आजारपण, अभ्यास इ. सर्व सांभाळले तू नेहमी तत्परतेने

 आई तुझ्या हातची चव साक्षात अन्नपूर्णा 

चहा पोह्याचा बेत येणाऱ्यांना ही देई आपलेपणा 

 "अतिथी देवो भव" उक्तीला तू केले सार्थ

 सासरचे असो वा माहेरचे सर्वच होई तुझ्यामुळे संतुष्ट  

कुटुंबातील सर्वांना दिले तू नेहमी प्रोत्साहन 

कुटुंबाला सर्वस्व मानून जगली तू निस्वार्थ, सरळ जीवन  


आज तुझा वाढदिवस काय लिहू आई तुझ्याबद्दल 

मायेला तुझ्या तुलनाच नाही 

लिहिता लिहिता अपुरी पडेल शाई

आज एवढीच इच्छा 

उदंड, निरामय, सुखमय, धर्मामय दीर्घायुष्य लाभो तुला तुझ्या ममतेच्या आशीर्वादाचा हातांचा 

स्पर्श नेहमीच ऊर्जा देईल आम्हाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children